- निकाल तयार करण्याची प्रक्रिया25 ऑगस्ट 20251. सहभागी सर्व कथामालिकांमधून पात्र असलेल्या कथामालिकांची निवड प्रक्रिया: निवडीचे नियम: प्रकाशन तारीख: कथामालिका स्पर्धेच्या अधिकृत कालावधीतच प्रकाशित झालेली असावी. किमान भागसंख्या: स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तेवढे भाग प्रकाशित केलेले असावेत. प्रत्येक भागातील शब्दसंख्या: प्रत्येक भागासाठी निश्चित केलेली किमान शब्दसंख्या पूर्ण झालेली असावी. स्पष्ट मजकूर धोरण (Explicit Content Policy): कथा प्रतिलिपिच्या Explicit Content Guidelines प्रमाणे असावी. नियमबाह्य मजकूर असलेली कथामालिका अपात्र ठरेल. (सविस्तर धोरणासाठी इथे क्लिक करा) डुप्लिकेट किंवा कॉपी/प्लॅजिअरिझ्ड साहित्य: अशा नोंदी अपात्र ठरवल्या जातील. 2. परीक्षण प्रक्रिया: निवड केलेल्या कथामालिका त्या भाषेतील तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीकडून तपासल्या जातात. कथा गुणांकन करताना खालील मुद्दे विचारात घेतले जातात: कथनशैलीची गुणवत्ता: लेखकाने कथा किती रंजक आणि प्रभावीपणे सांगितली आहे, वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे का हे तपासले जाते. मौलिकता: नवनवीन व अनोख्या कल्पना, ज्या सामान्य वा वारंवार येणाऱ्या कथांपेक्षा उठून दिसतात. वाचकांवर परिणाम: कथेने निर्माण केलेले भावनिक नाते जे वाचून झाल्यानंतरही वाचकाच्या मनात राहते. (हे वाचकांच्या कमेंट्समधूनही दिसून येते.) प्लॉट ट्विस्ट्स: कथेतले अनपेक्षित वळण, ज्यामुळे पुढे काय होईल याची उत्कंठा वाढते. कथेची गती: प्रसंगांचा प्रवाह न अति धीमा न अति वेगवान, पण वाचकाची रुची कायम ठेवणारा. ट्विस्ट्स आणि टर्न्स: अचानक घडणाऱ्या घडामोडी ज्यामुळे थरार आणि उत्सुकता जिवंत राहते. पात्रनिर्मिती: पात्रे किती जिवंत वाटतात आणि कथानकात विकसित होतात, ज्यामुळे वाचक त्यांच्याशी नाते जोडतात. टीप: प्रत्येक परीक्षक स्वतंत्रपणे गुणांकन करतो. नंतर सर्व गुणांचे सरासरी काढून अंतिम रँक निश्चित केली जाते. 3. डबल-चेक प्रक्रिया गुणांकन झाल्यानंतर कथामलिकांची पडताळणी दोन सदस्यांच्या अंतर्गत भाषा टीमकडून केली जाते. यामध्ये नियमांचे पालन झाले आहे का आणि न्याय्य गुणांकन झाले आहे का हे पाहिले जाते. त्यानंतर आवश्यक ते बदल करून अंतिम विजेत्यांची यादी तयार करून पुन्हा एकदा अचूकतेसाठी तपासली जाते. 4. निकाल जाहीर करणे निकाल प्रतिलिपिच्या अधिकृत ब्लॉग विभागामध्ये प्रकाशित केले जातात. विजेत्यांना वैयक्तिकरित्या अॅप नोटिफिकेशन किंवा ई-मेलद्वारे माहिती दिली जाते. आम्हाला ठाऊक आहे की लेखन व त्याचे परीक्षण ही व्यक्तिनिष्ठ प्रक्रिया आहे. एका व्यक्तीला आवडलेली कथा दुसऱ्याला आवडेलच असे नाही. पण आमची मूल्यांकन प्रक्रिया सर्वांसाठी न्याय्य, सुसंगत आणि निष्पक्ष राहील अशी रचना केलेली आहे. शुभेच्छा, टीम प्रतिलिपिसर्व मजकूर पहा
- सुपर लेखक अवॉर्ड्स - 9 | निकाल04 मे 2025सुपर लेखक अवॉर्ड्स - 9 | निकाल प्रिय लेखकांनो, प्रतीक्षा संपली आहे! सुपर लेखक अवॉर्ड्स - 9 चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत 70 भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे. 12 भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे! उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व सुपर लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत. **सूचना : खालील विजेत्यांना पुढील 3-4 दिवसात [email protected] वरून बक्षीसासाठी आवश्यक तपशील मिळण्यासाठी ईमेल प्राप्त होईल.** सुपर लेखक विजेत्यांची यादी (1 ते 3 क्रमांकाचे वेजेते: ₹5000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + सोशल मीडियावर खास स्पॉटलाइट 'लेखक पोस्ट' ) 1 Anjali Vengurlekar - सैतानाचा जन्म 2 Anandi Shedge Anu 🌹 - स्पर्श मनाचा मनाला 💛💛 3 वैशाली - अध्यायम ✨ (4 ते 10 क्रमांकाचे वेजेते: ₹3000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + सोशल मीडियावर खास स्पॉटलाइट 'लेखक पोस्ट') 4 Kalyani - तेरे लिए... प्रेमाची अनोखी परिभाषा 💞 5 💖Prachi Sule💖शब्दपरी ✍️ - 🔥 आर्यवंशी 🔥 अंडरवर्ल्ड लवस्टोरी 🔥 6 सुरेश कुलकर्णी - मौरवी! (इन्स्पे. इरावती कथा!) 7 दर्शना🌷स्वप्न सखी🌷 - मन वेडे गुंतले - The ocean of love🌊💓 8 प्रियु माने - जीव पिसाटला ❤️ 9 Nooraj 😍Rohini - हासिल :( his obsession for her)-१ 10 Jyoti Patilmani🙈 - वेदांगी - एक अनोखं मातृत्व 🤱❤️🩹 (11 ते 30 क्रमांकाचे वेजेते: ₹1000रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + सोशल मीडियावर खास स्पॉटलाइट 'लेखक पोस्ट') 11 सौ नंदा भा गायकवाडगिरिजा - ती फुलराणी 🌹 अराधना भाग 1 12 Dr Aniket Manepatil - अभिमन्यू' 13 Madhuri Parab - ⚜️-प्रतिपाण-⚜️ - १ 14 Rani Chavan - सुडाग्नी🔥 एक रक्तरंजित प्रेम कथा. 15 Harshu - रिवेंज : The Love Story 16 🅿️Riti 🤍🥀प्रितलिखित - तेरे प्यार में...❤️🔥 17 Sharayu Rajput - संयोग प्रीत 18 पूजा तरडेराश्री. ❤️ ✍️ - माय सरोगेट वाईफ... कंडीशनल मॅरेज 19 Komal - त्व रक्षणाय सर्वदा: 20 Apurva Jainappu - खेळ नियतीचा.... 21 Vishakajadhvशब्दसरीता - बारादारी... भाग.. 1 22 ❤️स्वाती साबळे😇❤️💫Sweety - इश्क सुफियाना.!❤️🩹 23 स्नेहलता गाडेस्नेहा - माय मिस्टर परफेक्ट 😍 भाग १ 24 Amol Jadhavamol - मिशन चंद्रयान - १२५ (सन २१२२) 25 C R 🦋 - अमोली 26 𝐏𝐨𝐨𝐣𝐚 𝐏𝐢𝐬𝐚𝐥𝐉𝐚𝐝𝐡𝐚𝐯✨ डाव सोनेरी सुखाचे ✨ पर्व : दुसरे 27 Swatswa. - प्रेम परिक्षा नात्याची💔 28 Pooja Tawdereshma - लग्न - प्रेमाचा अनोखा करार 29 Dr Diptiie Tenddulkar - जिंदगी इत्तिफाक है!!💕 30 सुदिन नाईक - कलियुगी... (31 ते 50 क्रमांकाचे वेजेते: निकालात विशेष उल्लेख + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र) 31 Sharakha - तु आस माझी .. 32 Radha ️️Krishn - "पृथ्वीराज" एक विलक्षण प्रेमकहाणी 33 Vidya S World - प्रेमा काय देऊ तुला?.. 34 अस्मि - विवाह: एक करार की पवित्र बंधन 35 Priyanka Mayurpriyur - अकल्पित सारे घडले 36 नीलम लिला विनायक सरोते - मिस्टर अंडरवर्ल्ड👿 { भाग- एक } 37 देवगणDevgan A,🌹K,💐 - वाडा - एक रहस्य कथा . सीझन -३ . भाग -१ . ( सुरवात ). 38 सोहनी - नवी पहाट.. 39 सई कदम - का रे दुरावा.... 40 Diksha Kamble - जीवनसाथी साथ : जन्मांतराची 41 💕💕 शामल लोंढे 💕💕स्वीट गर्ल 💕💕 - ...कळत नकळत... 42 Suresh Pathak - साथ जन्मा जन्माची ( भाग - 1 ) 43 Vaishali Ypyashali - मधुकेत💖 पर्व २ - प्रवास प्रेमाचा 44 निर्मला सोनी - देवदासी - पर्व २ रे ( भाग १ ) 45 Dr Vrunda F(वसुंधरा..) - चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ! 46 Karishma(Vani ❣️) - श्वास तू....❤️🔥(तू फक्त माझी आहेस) 47 Tanu - Unconditional Love ❣️🫶🏻Season 2 48 Anagha Ravindra Paranjape*कृष्णसखी अनू*❤️ - काव्यांजली .... एक धगधगती ज्वाला 49 Komal - त्याचे कर्तव्य 50 Aryan Bhave - अंधारातील सावल्या 100 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी-(ईमेलद्वारे प्रतिलिपिकडून 'साहित्य सन्मान पत्र') Jyoti Jadhav - द्वेषाचा उन्माळा 💞 प्रीतीचा जिव्हाळा Diksha Kamble - जीवनसाथी साथ : जन्मांतराची Sneha T - प्रतिज्ञा'.....तिच्या संघर्षाची Ashwini Kambleashu - जुळवून आणल्या रेशीमगाठी...💞 सुदिन नाईक - कलियुगी... Rina Patil - अनोख्या प्रेमाचा अनोखा संघर्ष मनातले चांदणेFollower Of Dreams - गुम है किसी के प्यार में.... पर्व दुसरे C R 🦋 - अमोली चैत्राली यमगरDombale - करार एका लग्नाचा सिझन ३ अभी केतकी ❤️ ❤️ प्रीत अशी ही Smita Patilस्मितू ❣️ - एक्सट्रा मॅरिटल अफेयर ( प्रेम , पैसा की हवस...?) Jyoti Patilmani🙈 - वेदांगी - एक अनोखं मातृत्व 🤱❤️🩹 𝐏𝐨𝐨𝐣𝐚 𝐏𝐢𝐬𝐚𝐥𝐉𝐚𝐝𝐡𝐚𝐯 - अनिरुद्ध ❤️वृंदा.... ✨ डाव सोनेरी सुखाचे ✨ पर्व : दुसरे. लेखिका : पूजा पिसाळ " जाधव..." वैशाली - अध्यायम ✨ प्रदीप कुलकर्णीविवेक - काव्या Radha ️️Krishn - "पृथ्वीराज" एक विलक्षण प्रेमकहाणी प्रियु माने - जीव पिसाटला ❤️ Swatswa. - प्रेम परिक्षा नात्याची💔 Komal - त्याचे कर्तव्य Sharayu Rajput - संयोग प्रीत Shilpa Sutar - एका अनोळखी वळणावर प्रतिक्षा प्रमोद जोशी 🍁✨ - ️राधारंग प्रेमाची सीमारेषा 💜 💕💕 शामल लोंढे 💕💕स्वीट गर्ल 💕💕 - ...कळत नकळत... निर्मला सोनी - देवदासी - पर्व २ रे ( भाग १ ) वंदना सोरतेकाव्यसम्राज्ञी - निरंजना (भाग १) सई कदम - का रे दुरावा.... सविता सूर्यवंशी 💞( अबोली ) - सौभाग्यवती भव: 🌹 एक अनोखं गठबंधन..💝 Anu 🥀 - Unwanted Bride Of राजवंशी.. भालचंद्र देवBhooshan - आंधळे प्रेम Aryan Bhave - Police Stories नरेंद्र कुलकर्णी - पुन्हा नव्याने. .. .. .भेटलीस तू Sunita S Nagargojeपवित्रा😊 - अनवीर-(द रिव्हेंज ऑफ लव) Rohini Bangar - साथ तुझ्या स्वप्नांची. Ekta - सैनिक - The Military Men Mahi Mhatre - Shield Of Power Harshu - रिवेंज : The Love Story Aryan Bhave - अंधारातील सावल्या ↩️♈💲🔅♑🅰️🗼ℹ️Dewdrop - सिक्रेटली इन लव्ह.. डॉ किमया मुळावकर - मधुरीमा लाजरी लेखणी 🖋✏️ - १) जखमी मेहंदीचा रंग"... Aryan Bhave - डिटेक्टिव्ह स्टोरीज भूषण शानभागकवी भूषण - परमेश्वराचा मृत्यू Rudra Bagal - मायाजाल ! एक रहस्यमय कथा अश्विनी कुणाल ओगलेमनातल्या कथा🌹 - सावर रे मना Shinchan - "तु है की नही ?"... वाचक प्रतिबद्धता स्कोअरवर(एंगेजमेंट स्कोअर) आधारित 100 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या टॉप 20 लेखकांची यादी (घरच्या पत्त्यावर विशेष पुरस्कार) Radha ️️Krishn - "पृथ्वीराज" एक विलक्षण प्रेमकहाणी Anu 🥀 - Unwanted Bride Of राजवंशी.. वैशाली - अध्यायम ✨ प्रियु माने - जीव पिसाटला ❤️ Harshu - रिवेंज : The Love Story Jyoti Patilmani🙈 - वेदांगी - एक अनोखं मातृत्व 🤱❤️🩹 𝐏𝐨𝐨𝐣𝐚 𝐏𝐢𝐬𝐚𝐥𝐉𝐚𝐝𝐡𝐚𝐯 ✨ डाव सोनेरी सुखाचे ✨ सविता सूर्यवंशी 💞( अबोली ) - सौभाग्यवती भव: 🌹 एक अनोखं गठबंधन..💝 Ashwini Kambleashu - जुळवून आणल्या रेशीमगाठी...💞 सई कदम - का रे दुरावा.... Shilpa Sutar - एका अनोळखी वळणावर Diksha Kamble - जीवनसाथी साथ : जन्मांतराची Komal - त्याचे कर्तव्य Jyoti Jadhav - द्वेषाचा उन्माळा 💞 प्रीतीचा जिव्हाळा 💕💕 शामल लोंढे 💕💕स्वीट गर्ल 💕💕 - ...कळत नकळत... Sunita S Nagargojeपवित्रा😊 - अनवीर-(द रिव्हेंज ऑफ लव) C R 🦋 - अमोली नरेंद्र कुलकर्णी - पुन्हा नव्याने. .. .. .भेटलीस तू Swatswa. - प्रेम परिक्षा नात्याची💔 पहिल्यांदाच 70 भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी -(ईमेलद्वारे प्रतिष्ठित 'प्रशंसा पत्र') 💕💕 शामल लोंढे 💕💕स्वीट गर्ल 💕💕 - ...कळत नकळत... Smita Patilस्मितू ❣️ - एक्सट्रा मॅरिटल अफेयर ( प्रेम , पैसा की हवस...?) Mahi Mhatre - Shield Of Power लाजरी लेखणी 🖋✏️ - १) जखमी मेहंदीचा रंग"... भूषण शानभागकवी भूषण - परमेश्वराचा मृत्यू Rudra Bagal - मायाजाल ! एक रहस्यमय कथा नीलम लिला विनायक सरोते - मिस्टर अंडरवर्ल्ड👿 { भाग- एक} Anushka Dinesh Jawale - 💞 जीव माझा गुंतला 💞 Sulochana Daddenavar - स्वप्नातला राजकुमार...भाग 1 Samiksha Jamkhedkar - तिचा संघर्ष दर्शना🌷स्वप्न सखी🌷 - मन वेडे गुंतले - The ocean of love🌊💓 Suresh Pathak - साथ जन्मा जन्माची ( भाग - 1 ) Tanu - Unconditional Love ❣️🫶🏻Season 2 वाचनवेडी - रूपा- सुंदरता मनाची Apurva Jainappu - खेळ नियतीचा.... अस्मि - विवाह: एक करार की पवित्र बंधन Karishma(Vani ❣️) - श्वास तू....❤️🔥(तू फक्त माझी आहेस) विक्रम सावंत - दुरावा - एक अपूर्ण राहिलेल प्रेम Aaarya - प्रेमस्पर्श : the begining of love अनामिकाअनामिका - अनामिका...... Ketaki 39 S World 😍(Ketu ) - हृदयस्पंदन मनिषा भिसे - कॉन्ट्रॅक्ट मॅरेज _ लव अन कंडिशनल या स्पर्धेशी संबंधित तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तुम्ही आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर थेट लिहू शकता. आमची टीम 24 तासांच्या आत प्रतिसाद देण्याचे उद्दिष्ट ठेवते. प्रतिलिपि हजारो लेखकांसोबत रोज काम करत आहे आणि त्यांची स्वप्ने सत्यात उतरवत आहे. आम्ही तुमच्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार करत आहोत. तुमच्याकडे प्रतिभा असल्यास, तुम्ही लेखन श्रेत्रात करिअर करू शकता. तुमच्या लेखनातून दरमहा कमाई करू शकता. सहभागी होऊ शकता आणि बेस्ट सेलर लेखक होऊ शकता. चला तर मग लिहायला सुरुवात करूया. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! प्रतिलिपि इव्हेंट्स टीमसर्व मजकूर पहा
- प्रतिलिपि क्रिएटर्स प्रोग्राम 2.0 – लेखक मुलाखती विशेष!03 फेब्रुवारी 2025प्रतिलिपि क्रिएटर्स प्रोग्राम 2.0 अंतर्गत 80 भागांची कथामालिका लिहिणाऱ्या लेखकांच्या मुलाखती येथे दिल्या जातील. या मुलाखतींमध्ये त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल, प्रेरणास्त्रोतांबद्दल आणि या प्रोग्रामच्या अनुभवाबद्दल माहिती मिळेल. या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्यांच्या विशेष लेखी मुलाखतींच्या लिंक आणि लेखक प्रोफाइल्स पाहायला मिळतील.तुम्ही लेखकांच्या प्रोफाइलला भेट देऊ शकता आणि त्यांनी प्रकाशित केलेल्या उत्तम कथा वाचू शकता. लेखकांच्या अधिकृत मुलाखती आणि प्रोफाइल लिंक खाली दिलेल्या आहेत. वाचा आणि प्रेरणा घ्या! 🚀📖 1 लेखकाची मुलाखत एकता निलेश माने 2 लेखकाची मुलाखत आर्यन भावे 3 लेखकाची मुलाखत स्नेहा रेडेकर 4 लेखकाची मुलाखत नीलम सरोते 5 लेखकाची मुलाखत आश्विनी गोरख आढांगळे 6 लेखकाची मुलाखत स्वाती किसन साबळे 7 लेखकाची मुलाखत सागर देविदास पवार 8 लेखकाची मुलाखत मिनल प्रविण मगदुम 9 लेखकाची मुलाखत विशाल सिद्धराम पवार (Mr. Philosopher) 10 लेखकाची मुलाखत स्नेहा तोडकर 11 लेखकाची मुलाखत प्राजक्ता परिमल खेडेकर विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा:https://marathi.pratilipi.com/event पुढील लेखनासाठी शुभेच्छा!सर्व मजकूर पहा
- प्रतिलिपि सुपर लेखक अवॉर्ड्स 8 – विशेष लेखक मुलाखती!03 फेब्रुवारी 2025प्रतिलिपि सुपर लेखक अवॉर्ड्स-8 अंतर्गत, ज्यांनी 120+ हून अधिक भागांची कथामालिका पूर्ण केली आहे, अशा प्रतिभावान लेखकांसाठी आम्ही एक खास लेखी मुलाखत घेतली आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्यांच्या विशेष लेखी मुलाखतींच्या लिंक आणि लेखक प्रोफाइल्स पाहायला मिळतील.तुम्ही लेखकांच्या प्रोफाइलला भेट देऊ शकता आणि त्यांनी प्रकाशित केलेल्या उत्तम कथा वाचू शकता. लेखकांच्या अधिकृत मुलाखती आणि प्रोफाइल लिंक खाली दिलेल्या आहेत. वाचा आणि प्रेरणा घ्या! 🚀📖 1 लेखक मुलाखत रोहिणी किसन बांगर 2 लेखक मुलाखत चैत्राली यमगर डोंबाळे 3 लेखक मुलाखत नरेंद्र कुलकर्णी 4 लेखक मुलाखत सुनिता श्रीरंग नागरगोजे 5 लेखक मुलाखत एकता निलेश माने 6 लेखक मुलाखत रचना सोनार (सार्थश्री) 7 लेखक मुलाखत जाण्हवी जीवन साळवे 8 लेखक मुलाखत अनुश्री लेखाराम धाबेकर 9 लेखक मुलाखत शिल्पा सुतार 10 लेखक मुलाखत मेघना माने यादव 11 लेखक मुलाखत प्रा. सुनिता भारत थोरबोले 12 लेखक मुलाखत वनिता कमलाकर पुदाले 13 लेखक मुलाखत अनुराधा (राधा) 14 लेखक मुलाखत स्नेहा तोडकर 15 लेखक मुलाखत सुदिन एकनाथ नाईक विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा:https://marathi.pratilipi.com/event पुढील लेखनासाठी शुभेच्छा!सर्व मजकूर पहा
- सुपर लेखक अवॉर्ड्स - 8 | निकाल17 डिसेंबर 2024प्रिय लेखकांनो, प्रतीक्षा संपली आहे! सुपर लेखक अवॉर्ड्स - 8 चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत 80 भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे. १२ भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे! उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व सुपर लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत. **सूचना : खालील विजेत्यांना पुढील 3-4 दिवसात [email protected] वरून बक्षीसासाठी आवश्यक तपशील मिळण्यासाठी ईमेल प्राप्त होईल.** सुपर लेखक विजेत्यांची यादी (1 ते 5 क्रमांकाचे वेजेते: घरच्या पत्त्यावर विशेष अवॉर्ड + ₹5000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र) 1 Anushree Dhabekar - माझं काय चुकलं..?? 2 दिपाली पारकर - प्रेम -- एक तपस्या ❤️🔥 भाग 1 3 Sarika Kandalgaonkar - वाड्यात येऊन जा.. 4 सिध्दी गौतम साळवी - फक्त मिठीत घे🫂 5 Dr Diptiie Tenddulkar - थोडा थोडा प्यार हुआ तुमसे! (6 ते 10 क्रमांकाचे वेजेते: घरच्या पत्त्यावर विशेष अवॉर्ड + ₹3000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र) 6 Sarvesh Naik - कस्तुरीगंधा... द फ्लॉवरींग ट्री 7 Kalyani - प्रीतीत ये ना 💕 8 Deepali Narangale - *दृष्टी.......कोण .!..*.. 9 Rajashri Jadhav - हळद माझी रुसली... 10 Harshu - इश्क ❤️🔥 ' his unconditional love for her ' ❤️🔥 (11 ते 20 क्रमांकाचे वेजेते: घरच्या पत्त्यावर विशेष अवॉर्ड + ₹1000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र) 11 Shilpa T - गारपीट -अशक्य प्रेमाची शक्य झालेली कहाणी. 12 स्नेहलता गाडे - सायको लव्हर भाग १ 13 Pooja Pisal - अनिरुद्ध ❤️ वृंदा... एक अनोखी लग्नगाठ .... 14 दुर्गा बापू- मोह - भाग १ 15 Isha - माफिया - अँगल ऑफ लव्ह 💘 16 Sneha Mane Madane ❤️ - संगिनी..... एक प्रेमकहाणी... 💕 17 Harshada - बंधन नात्यातलं💟 भाग - 1 18 Jyoti Jadhav - प्रीत तुझ्यावर जडली रे 💘 न सांगता ओळख तु रे 19 माधुरी परब - ❣️ मैत्री - स्नेहबंध जिव्हाळ्याचा ❣️ 20 A G S K - जगण्याचं कारणं तू (21 ते 50 क्रमांकाचे विजेते: ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र) 21 Dr Aniket Manepatil - अर्धसत्य' 22 Dr Vrunda F - मधुमालती..कथा अनोख्या प्रेमाची! 23 Kirti Vipradas - कलाटणी 24 Dream गर्ल - चांदणी 💖 : My Contracted Girlfriend 25 वनिता पुदाले - ️वैधव्यता एक शापित वरदान 26 Jyoti Patil - His Little SUNSHINE 🩷✨ 27 प्रभाकर पवार - निब्बर झुंज 28 मेघना माने यादव - सर सुखाची श्रावणी 29 वैष्णवी चव्हाण - Crown of hearts: a royal romance...? 30 Jelly Bean😘 - लग्नगाठ 🔥 एक पवित्र बंधन... 31 Mohini 💫 - क्षितीजा { A marriage by contract } 32 Prachi Parande - जानेमन 💕 Feel Me (भाग 1) 33 Swat - नाते तुझे माझे💞 34 Rhutuja S - सिमंतिनी... Lesbian Love story 💞💞💞-1 35 💖 Minakshi Mhatre 💖 - 📿शिवशक्ती - शैतानी द्वार 36 𝕵𝖆𝖓𝖍𝖆𝖛𝖎❤️𝖏𝖆𝖆𝖓❤️ - प्रेमाची गोष्ट- ट्रू लव्ह नेव्हर एंडिंग 37 सोहनी - ध्यास 38 Archana Sonagre - संहिता वधूची 39 Sunita Chavan - गोष्ट एका मुलीचीभाग ०१ 40 Sharayu Rajput - फ्युजन ऑफ लव्ह - पर्व 1 41 Radha ❤️❤️ - तुझे कीतना चाहने लगे हम. 42 Gayatri Rode - Coffee Partner ❤️ 43 Shilpa Sutar - नकळत मन जुळले 44 ↩️♈💲🔅♑🅰️🗼ℹ️ - रुडनेस ओव्हरलोडेड.. 45 प्राची करंदीकर - द व्हायलेट लाईफ 46 Anjali Vengurlekar Amp 34 अंजू 🌹🌹🌹🌹 Amp 34 34 अंजू 🌹🌹🌹🌹 34 - शापित सौभाग्य ( भाग१) 47 Durga Mate - मिस्टेक the bond of love .... 48 वंदना केंभावी - किमया अशी कुणाची - भाग १ 49 संतोष देशपांडे - स्पर्श : (कालस्पर्श):-१ 50 चैत्राली यमगर - मोहब्बत सुपर लेखक ८ साठी कथा 120 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी (अधिकृत 'साहित्य सन्मान पत्र' घरच्या पत्त्यावर + संपूर्ण प्रतिलिपि कुटुंबासह मुलाखती आणि प्रोफाइल शेअर करण्याची विशेष संधी ) प्रभाकर पवार - निब्बर झुंज Jelly Bean😘 - लग्नगाठ 🔥 एक पवित्र बंधन... मेघना माने यादव - सर सुखाची श्रावणी Shilpa Sutar - नकळत मन जुळले ↩️♈💲🔅♑🅰️🗼ℹ️ - रुडनेस ओव्हरलोडेड.. वनिता पुदाले - ️वैधव्यता एक शापित वरदान Sunita Chavan - गोष्ट एका मुलीचीभाग ०१ Radha ❤️❤️ - तुझे कीतना चाहने लगे हम. Rohini Bangar - हे बंध प्रेमाचे Harshu - इश्क ❤️🔥 ' his unconditional love for her ' ❤️🔥 अनामिका - जीवनरंग भाग एक Anushree Dhabekar - माझं काय चुकलं..?? Dr Aniket Manepatil - अर्धसत्य' Rachana S - विनय - एक रहस्य Sneha T - तपस्या'....Fight's for her identity Sunita S Nagargoje - गंध प्रेमाचा-कॉलेज वाली लव्ह स्टोरी💖❣️ सुदिन नाईक - काशी मठ २ किरण वणवे - साहसी तरूणी - लिली नरेंद्र कुलकर्णी - साथ. .. .तुझ्या प्रेमाची मनातले चांदणे - गुम है किसी के प्यार में एक Ekta - प्रेम - एक अग्नीपरिक्षा 1 निशिगंधा 🍁 𝕹𝖎𝖘𝖍𝖎𝖌𝖆𝖓𝖉𝖍𝖆 ओमणवार 🖊️ 𝕺𝖒𝖆𝖓𝖜𝖆𝖗 - प्रेमाचा तडका - लव्ह, फूड अँड फाईट 𝕵𝖆𝖓𝖍𝖆𝖛𝖎❤️𝖏𝖆𝖆𝖓❤️ - प्रेमाची गोष्ट- ट्रू लव्ह नेव्हर एंडिंग चैत्राली यमगर - मोहब्बत सुपर लेखक ८ साठी कथा Archana Kohale - काळजाचे कोरे पहिल्यांदाच 80 भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी (ईमेलद्वारे प्रतिष्ठित'प्रशंसा पत्र') वनिता पुदाले - ️वैधव्यता एक शापित वरदान Sunita Chavan - गोष्ट एका मुलीचीभाग ०१ अनामिका - जीवनरंग भाग एक Rachana S - विनय - एक रहस्य Sneha T - तपस्या'....Fight's for her identity सुदिन नाईक - काशी मठ २ किरण वणवे - साहसी तरूणी - लिली Isha - माफिया - अँगल ऑफ लव्ह 💘 Swat - नाते तुझे माझे💞 Pooja Pisal - अनिरुद्ध ❤️ वृंदा... एक अनोखी लग्नगाठ ....Written by Pooja Jadhav. 🍁 Anjali Vengurlekar Amp 34 अंजू 🌹🌹🌹🌹 Amp 34 34 अंजू 🌹🌹🌹🌹 34 - शापित सौभाग्य ( भाग१) Dr Diptiie Tenddulkar - थोडा थोडा प्यार हुआ तुमसे! L G - गौडबंगाल !!....१. ❤️💛🤎 Mohini 💫 - क्षितीजा { A marriage by contract } माधुरी परब - ❣️ मैत्री - स्नेहबंध जिव्हाळ्याचा ❣️ Kirti Vipradas - कलाटणी सोहनी - ध्यास प्राची करंदीकर - द व्हायलेट लाईफ Pallavi Patil - ध्यास (dhyas) महेश गायकवाड - तूच माझी अर्धांगिनी P - मोह - भाग १ Sneha Mane Madane ❤️ - संगिनी..... एक प्रेमकहाणी... 💕 A G S K - जगण्याचं कारणं तू Rhutuja S - सिमंतिनी... Lesbian Love story 💞💞💞-1 वंदना केंभावी - किमया अशी कुणाची - भाग १ ✍ ᵣₑ𝘴𝓱ᗰₐ 𝐩ₐ𝚝ᵢᄂ 💞 - तुझ्या सोबतीने.....💝..1 Kishori Thite - जीना इसी का नाम है Rasika - सबसे बडा रोग (क्या कहेंगे लोग) सर्वम - लव यू अंकल Rx Manisha Kamble - 💗💝सोबती💝💗 पुजा - विश्वप्रभा (एक संघर्षगाथा) Jyoti Kiratkudve - अ मॅन विथ विंग्स भाग - १ Amruta Kulkarni - आगळे वेगळे प्रेम भाग -1 सौ नंदा भा गायकवाड - ❣️ हे बंध रेशमाचे.❣️...अधीर प्रितीचे...❣️ K⭕Ⓜ️🅰️ L 💞💞 कोमल मस्कर - 💖💖 साथ 💖💖 ( भाग - १ ) Prachi Rakesh - द अरेंज मॅरेज.... (सिझन दुसरा) ❣️चैत्राली चिनकटे ❣️ - 👣अस्तित्व 👣 निलेश बामणे - विजय - एक नायक Madhavi Parakh - एक निर्णय स्नेहल राणे - तन मन कोरे अधीर झाले... वैष्णवी चव्हाण - Crown of hearts: a royal romance...? सूचना : सर्व डिजिटल प्रमाणपत्रे आणि प्रशंसा पत्र [email protected] द्वारे पाठविली जातील. खालील विजेत्यांना पुढील 3-4 दिवसात [email protected] वरून बक्षीसासाठी आवश्यक तपशील मिळण्यासाठी ईमेल प्राप्त होईल. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! भविष्यात तुम्ही असे उत्तम लेखन कराल अशी आम्ही आशा करतो. आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या सुपर लेखक अवॉर्ड - 9 आणि प्रतिलिपि क्रिएटर्स चॅलेंज 3.0 मध्ये सहभागी व्हाल आणि तुमच्या वाचकांना लोकप्रिय आणि बेस्ट सेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event पुढील लेखनासाठी शुभेच्छा!सर्व मजकूर पहा
- प्रतिलिपि 10 वा वर्धापन दिन विशेष: आमच्या लेखकांची निवडक पत्रे आणि आठवणी!18 सप्टेंबर 2024नमस्कार! 14 सप्टेंबर 2024 रोजी प्रतिलिपिचा म्हणजेच आपल्या या प्रवासाचा 10 वा वर्धापन दिन साजरा झाला. या निमित्ताने, उपक्रमा अंतर्गत आम्ही लेखकांसाठी 'प्रिय प्रतिलिपि...' ही पत्रलेखन स्पर्धा आणि 'आठवण' स्पर्धा आयोजित केली होती. लेखकांनी आम्हाला पत्रे आणि आठवणी पाठवून या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला आणि त्यांच्या भावना व शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहचवल्या याबद्दल सर्व सहभागी लेखकांचे मानपसून आभार आणि अभिनंदन!! या उपक्रमामध्ये विजेते ठरलेले आणि आम्हाला प्राप्त झालेली इतर काही निवडक पत्रे आठवणी आम्ही इथे सामायिक करत आहोत. आशा आहे आमच्या लेखकांच्या भावना तुमच्या पसंतीस उतरतील. 💌 पत्रलेखन स्पर्धा: 🥇 प्रथम विजेते: Ashwini ( प्राजक्ता ) 🥈 द्वितीय विजेते: Sucheta K 🏅इतर निवडक पत्रे: गणेश फापाळे (अधीर मन) तनुजा Anushree Dhabekar एकता निलेश माने #C.R charu 🦋 Masira Momin गोविंद कुलकर्णी सन्मित्र Sangeeta Kasle ...✍️ SK 😇🌹 Sharvaree 🌼🍁 Dr. Aniket Manepatil शिवा ..... Ganesh Ombase Archana Sonagre 💫 सौ ...L.G💫.... कामिनी खाने साक्षी शेवाळे ..🦋 जयश्री शिंदे 🦋..👑रत्नश्री👑 🦋༄Ӄʳϊ𝙨ԩ𝘯ᾰ𝓈𝔞ꝁԩ𝚒༄🦋 Jyoti Patil Angha Likhite Harshala शलाका भोजने - माजरेकर माधुरी परब Archana Kohale वंदना सोरते Sangita Tathod रविंद्र मिसाळ आश्विनी..... Madhavi Parakh Shilpa T अर्चना उमाळे Rasika श्री Medha Bhandarkar सौ. नंदा भा गायकवाड 🍁💞 मुग्धा 💞🍁 प्राची कांबळे विद्या कुंभार (अनामिका) Chetana Joshi Mirkute Vishaka Jadhav 🌠 आठवण स्पर्धा: 🥇 प्रथम विजेते: Ankita Ujjainkar 🥈 द्वितीय विजेते: Anushree Dhabekar 🏅 इतर निवडक आठवणी: 1. N K निक्की निकिता 2. Dr. Aniket Manepatil 3. Archana Sonagre 4. Deepali Narangale 5. कामिनी खाने 6. नरेंद्र कुलकर्णी 7. आश्विनी..... 8. Shilpa T 9.एकता निलेश माने 10. P R❤️ 11. सौ.भाग्यश्री जनकवाडे 12.विद्या कुंभार (अनामिका) 13. Harshala सादर, टीम प्रतिलिपिसर्व मजकूर पहा
- आमच्या लेखकांच्या यशोगाथा13 सप्टेंबर 2024शब्द आणि कर्मांद्वारे परिवर्तन! सौ. गुजराथी यांना लहानपणापासूनच कल्पना/कथांच्या जगाची आवड होती. पुस्तके वाचणे, आवडत्या लेखकांना जाणून घेणे आणि त्यांच्या मुलाखती पाहणे, त्याबद्दल चर्चा करणे या प्रत्येक गोष्टीने त्यांना एक वेगळाच आनंद दिला. मयुरी या सुरुवातीला छंद म्हणून लिहायच्या पण हळूहळू त्यांनी आपल्या लिखाणाला त्यांची आवड म्हणून महत्व देण्यास सुरुवात केली ज्यावर त्यांचे कुटुंब थोडे नाखूष होते. कारण त्या फोन वापरण्यात पूर्वीपेक्षा जास्त वेळ घालवत होत्या. पण, जेव्हा त्यांनी प्रतिलिपिवर कमाई सुरू केली तेव्हा त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या या आवडीला मनापासून पाठिंबा देऊ लागले! एक गोष्ट मयुरी नेहमी म्हणतात की, "मिळवलेल्या ज्ञानाने पैसे कमवणे, कष्टाने पैसे कमवणे हे कोणाचेही मोठे स्वप्न असेल पण... जर लोक तुमच्या प्रतिभेवर खूश असतील आणि त्यासाठी पैसे खर्च करत असतील, तर तुम्ही नक्कीच काहीतरी मोठे साध्य करत आहात! आणि बहुदा मला ते जमलं आहे! मधुमिता २ साठी त्यांनी सेलेब्रेल पालसी (Cerebral palsy - CP) हा विषय जवळून हाताळला. सौ. गुजराथी यांनी कथानक अधिक संवेदनशीलपणे लिहिण्यासाठी त्यावर अधिक संशोधन करण्यास सुरुवात केली. मग त्यांनी विचार केला की, नुसते लिहून नाही तर अशा लोकांना काही मदत केली तरच त्या समाजामध्ये काही बदल आणू शकतील! मग त्यांनी ठरवूनच ठाकले की, त्या महिन्यात मधुमिता २ कडून मानधनाची जी काही रक्कम मिळेल, त्यामधून त्या सेलेब्रेल पालसीशी झगडत असलेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत प्रदान करतील. मयुरी यांना त्या महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात मानधनाचे पैसे मिळत नव्हते पण, दैवी योग म्हणा किंवा योगायोगाने त्या महिन्यात मला सुमारे रु. 24000 इतकी मानधनाची रक्कम प्राप्त झाली! त्या महिन्याच्या त्यांच्या कमाईची रक्कम आणि त्यामध्ये पदरची काही रक्कम जोडून मयुरी यांनी ठरवल्याप्रमाणे सढळ हाताने आश्रमाला मदत पाठवली! आशा आणि आनंदाचे रंग सौ. अमृता यांच्या वडील आणि आजी यांना वाचनाची आवड होती यामुळे लहानपणापासूनच त्यांनासुद्धा पुस्तके वाचण्याची विशेष आवड होती. परंतु, लग्नानंतर घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना त्यांची आवड जपायला वेळ मिळू शकला नाही. प्रतिलिपिने आयोजित केलेल्या भयकथा स्पर्धेची माहिती मिळाल्यावर लेखिकेच्या या स्पर्धेत शून्य अपेक्षा होत्या कारण अनेक सुप्रसिद्ध, प्रस्थापित लेखक सहभागी होत होते. पण पुढे जे घडले ते त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. त्यांच्या 'गंध' या कथेला उदंड प्रतिसाद मिळाला. वाचकांना ही कथा इतकी आवडली की त्यांनी लेखिकेला या भयकथेचे नवीन पर्व लिहिण्याची मागणी केली. त्यानंतर अमृता यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. सौ. अमृता सांगतात, "गृहिणी म्हणून घरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, त्यांची शाळा, अभ्यास आणि कोविडसारखे कठीण प्रसंगही प्रतिलिपिच्या मदतीने सोपे झाले. प्रतिलिपिमुळे लेखनाच्या वेडाचे हळूहळू व्यसनात रूपांतर झाले." सौ.अमृता म्हणाल्या, "मित्र आणि कुटुंबीय मला विचारू लागले की, 'लिखाणातून तुला मिळतं काय?' परंतु, जेव्हा प्रतिलिपिमध्ये कमाईचे अनेक मार्ग खुले झाले तेव्हा मला स्टिकर्स आणि सुपरफॅन्सच्या माध्यमातून वाजवी रक्कम मिळू लागली आणि 'एक दिवस मी तुम्हाला माझ्या कमाईतून भेट देईन!' हे माझ्या पतीला मस्करीत केलेले एक अनौपचारिक विधान खरे ठरले!" प्रेमाची भेट आपल्या आईसाठी खास भेटवस्तू मिळवण्यापेक्षा जगात कदाचित दुसरी चांगली भावना नाही. सुश्री तपती या मुळात लहानपणापासूनच पुस्तकी किडा होत्या. त्यांना कथेत हरवून जाणे आवडते आणि त्यांच्यासाठी जीवनातील कठोर वास्तवातून सुटण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग होता. 2020 मध्ये जेव्हा देशाला कोविड-19 महामारीचा सर्वाधिक फटका बसला होता, तेव्हा तपती यांची नोकरी गेली. चिंता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी लेखिकेने प्रतिलिपिमध्ये लेखन सुरू केले. प्रतिलिपिकडून मिळणारी ही अतिरिक्त कमाई लेखिकेला त्यांच्या मासिक पगाराचा भार काही प्रमाणात कमी करण्यात मदत करते. जुलै २०२२ हा महिना लेखिकेसाठी खूप खास होता. चार वर्षांपूर्वी 2018 मध्ये त्यांच्या आईला सोन्याची बांगडी खरेदी करायची होती. त्यावेळी त्यांच्याकडे आईसाठी हे विकत घेण्यासाठी इतके पैसे नव्हते. सक्रिय लेखक झाल्यानंतर आणि वाचकांचे प्रचंड प्रेम मिळाल्यानंतर लेखिकेने कमावलेल्या पगारासह या पैशाच्या मदतीने त्यांना त्यांच्या आईसाठी सोन्याची बांगडी खरेदी करायला मदत केली! तपती प्रतिलिपि आणि त्यांच्या वाचक-अनुयायांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, माझ्या आईला ही छोटी भेट देऊन जिने एवढ्या वर्षात माझी काळजी घेण्याशिवाय स्वतःसाठी काहीही केले नाही, मला खूप समाधान मिळाले आहे. माझ्या पालकांशिवाय आणि माझ्या वाचक कुटुंबाशिवाय हे कधीही शक्य झाले नसते." अभिमानाचे क्षण सौ. संगीता यांना सुरुवातीपासूनच गोष्टींची पुस्तके वाचण्याची आवड आहे. प्रतिलिपिमध्ये त्यांचा प्रवास एक वाचक म्हणून सुरू झाला. पण होमपेजवर 'लिहा' बटन पाहिल्यावर लागलीच त्यांनी मोठ्या आवडीने लिहायला सुरुवात केली. संगीता यांचे वडील शेतकरी आहेत. प्रत्येक वडिलांप्रमाणे त्यांनाही त्यांच्या लाडक्या मुलीसाठी सुरक्षित आणि योग्य भविष्य हवे होते. वडिलांच्या इच्छेनुसार लग्न झालेले असले तरीही केवळ कुटुंबाप्रती कर्तव्ये पार पाडली तर आपली स्वतःची ओळख नष्ट होण्याची भीती लेखिकेला होती. संगीता यांची, ऐन स्वास्थय मीत्ता एन्नावल नी नावाची कथा गजा चक्रीवादळावर आधारित होती. कथेतील मध्यवर्ती पात्र साकारण्यासाठी प्रेरणा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतली. लेखिका परदेशात त्यांच्या पती आणि मुलासोबत स्थित होत्या. यादरम्यान, लेखनाद्वारे केलेली कमाई दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली. प्रतिलिपिच्या कमाईच्या मदतीने लेखिकेने त्यांच्या वडिलांना एक सुंदर आणि सुबक अंगठी भेट म्हणून दिली. लेखिका सांगतात, मी माझ्या पतीकडून पैसे घेऊन भेटवस्तू विकत घेतली असती तर नक्कीच माझी इच्छा पूर्ण झाली असती पण यातून मला फारसे समाधान मिळाले नसते. मी दिलेल्या भेटवस्तूने माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर अपूर्व आनंदी भाव उमटला आहे. यामुळे त्यांना माझा कमालीचा अभिमान वाटला! आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी घेणे ही वडिलांची जबाबदारी असते. परंतु, मनात खोलवर हीच इच्छा असते की,आपल्या मुलीने तिच्या करिअरमध्ये यशस्वी व्हावे आणि स्वतःची अशी ओळख निर्माण करावी जेणेकरून तिने तिच्या छोट्याशा इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये. सौ. संगीता यांच्या कथेने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. स्वप्नांचा प्रवास सिंग यांनी प्रतिलिपि प्रीमियम विभागातून कमावलेल्या कमाईतून एक नवीकोरी स्कूटी खरेदी केली! त्यांनी त्यांच्या कुटुंबातील या नवीन सदस्याचे स्वागत करत तिला रामप्यारी हे नाव दिले आहे. श्रीमती सिंग म्हणतात, मला मागच्या २-३ वर्षांपासून स्कूटी घ्यायची होती पण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या खर्चामुळे मला माझ्या स्कुटीसाठी बचत करणे अशक्य झाले होते. आणि अखेरीस काल मी सर्व अडथळे दूर केले आणि माझ्या 'रामप्यारीचे' माझ्या कुटुंबात स्वागत केले. जेव्हा मी माझ्या घरी रामप्यारीला पहिले तेव्हा मला झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. श्रीमती सिंग पुढे म्हणाल्या, हे माझे पहिले कानातले नाहीत किंवा मी पहिल्यांदाच माझ्यासाठी काही खरेदी करत आहे असेही नाही. माझ्याकडे चांगली नोकरी आहे पण प्रतिलिपिद्वारे कमाईमधून मी जो आनंद अनुभवला तो अवर्णनीय आणि अद्भुत आहे. लहानपणीचा वाचन आणि लिहिण्याचा माझा छंद मला या उंचीवर घेऊन जाईल असे मला कधीच वाटले नव्हते. जिथे मी माझ्या शब्दांच्या आधारे एक वाहन खरेदी करू शकेन. तुम्ही सुरुवात तर करा, रस्ते आपोआप उघडतील गृहिणी असण्यासोबतच, श्रीमती श्री अनु यांनीही आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इतर गृहिणींप्रमाणेच लेखनाची त्यांची आवड नेहमी पूर्ण केली आहे. त्यांना येथे मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या या छंदाचा एक सखोल उद्देश त्यांच्या मनात निर्माण झाला. श्री अनु सांगतात, जेव्हा मी पहिल्यांदा लिहायला बसले तेव्हा, माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी माझी भरपूर चेष्टा केली की मी माझ्या लिखाणातून काय साध्य करणार आहे? पण आज मी त्या सर्वांना अभिमानाने सांगू शकते की, आज माझ्या वाचकांच्या पाठिंब्यासोबतच मी शब्दांच्या बळावर महिन्याला चांगली कमाई करत आहे. मे 2021 मध्ये जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वजण प्रभावित झाले होते, तेव्हा श्री अनु यांच्या बाळाचा जन्म वेळेपूर्वी झाल्याने त्याला उपचारासाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. अशा खडतर अवस्थेत त्यांना तातडीचा उपचार खर्च भागवणे कठीण झाले होते. त्यावेळी, त्यांना मे 2021 मध्ये प्रतिलिपिकडून त्यांची पहिली कमाई मिळाली जिचे वर्णन त्या "अनपेक्षित ठिकाणाहून आलेले पैसे अशा वेळी एक मोठा आशीर्वाद ठरला!" असे करतात. प्रतिलिपिमध्ये, मला केवळ भरपूर वाचक आणि अनुयायीच मिळाले नाहीत तर, येथे सुंदर मैत्रीही करायला मिळाली असल्याचे श्री अनु सांगतात. आनंदाचे आकाश श्री. हकीम यांच्यासाठी 'सायकल घेणे' हे त्याचे बालपणीचे सर्वात मोठे स्वप्न होते. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना ते स्वप्न कोणाला सांगताही येत नव्हते. ते सांगतात, माझ्यासारखा माणूस, जो शालेय जीवनात कधीच सहलीला गेला नाही, कधी हॉटेलमध्ये गेला नाही, ऐनवेळी परीक्षेची फी भरू शकला नाही, ज्याने प्रत्येक विषय एका वहीच्या दोन्ही बाजूंनी लिहिला, त्याच्यासाठी सायकल विकत घेणे हे एकमेव स्वप्न होते." श्री. हकीम सायकल न चालवताच मोठे झाले, पण त्यांना त्यांच्या मुलीसाठीही सायकल विकत घेणे परवडत नाही हे जाणवल्यावर पालक म्हणून त्यांना वाईट वाटले. अलीकडेच, त्यांनी प्रतिलिपि मधील त्यांच्या लेखनाद्वारे काही रक्कम मिळवण्यास सुरुवात केली. नुकतेच, त्यांच्या कथांवर वाचकांनी दाखवलेल्या प्रेम आणि पाठबळाच्या जोरावर त्यांनी जवळपास रु. ३००० कमावले. यामध्ये हकीम यांनी उरलेले पैसे जोडले आणि अभिमानाने आपल्या मुलीसाठी सायकल विकत घेत आपले स्वप्न पूर्ण केले आहे! ज्यांनी हे अनुभवले आहे, त्यांना माझा आनंद समजेल. लेखनातून मिळालेल्या उत्पन्नातून मी माझ्या मुलीचे आणि माझे स्वप्न पूर्ण करू शकलो! माझे साहित्य वाचलेल्या माझ्या सर्व प्रियजनांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला पुन्हा लिहिण्याची प्रेरणा दिली आणि आयुष्याच्या या निसरड्या टप्प्यावर मला आशेचा किरण दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नम्र माणसाला लेखक म्हणून मान्यता दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे!" हकीम म्हणाले.सर्व मजकूर पहा
- सीईओचे आभार पत्र13 सप्टेंबर 2024प्रिय प्रतिलिपि सदस्य, 10 वर्षांपूर्वी 14 सप्टेंबर 2014 रोजी आम्ही प्रतिलिपि वेबसाइटचे पहिले सार्वजनिक बीटा व्हर्जन लाँच केले. त्यावेळी आमच्या मनात अनेक शंका होत्या पण एकच विश्वास होता. स्वप्नांना आणि आकांक्षांना भाषा नसते. आमच्या निर्मात्यांना त्यांच्या कथा जगासोबत कोणत्याही अडथळ्यांशिवाय शेअर करता याव्यात अशी आमची इच्छा होती. आम्हाला माहित होते की हा प्रवास कठीण असेल, परंतु आम्ही आमच्या ध्येयाच्या जवळ पोहोचलो तर ते खूप फायदेशीर ठरेल यावर आमचा विश्वास देखील होता. आम्ही फक्त अपेक्षा केली नव्हती की ते प्रत्यक्षात किती कठीण आणि फायद्याचे असेल!!! असे काही क्षण होते जेव्हा सुरुवातीला 100 वापरकर्ते आमच्या प्लॅटफॉर्मचा भाग बनले तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला, त्यांच्या कथा प्रत्येक महिन्यात शेकडो वेळा वाचल्या गेल्या. आता, प्रतिलिपि हे एक दशलक्षाहून अधिक लेखकांचे एक मोठे कुटुंब बनले आहे आणि लेखकांच्या कथा दर आठवड्याला लाखो वेळा वाचल्या जात आहेत! 3 वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही लेखकांना उत्पन्न देण्यास सुरुवात केली नव्हती. तुमच्या कथेच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहणारे वाचक होते म्हणून तुम्ही सर्वजण प्रतिलिपिवर लिहीत होता. पण आत्ताच गेल्या महिन्यात, आमच्या वाचकांनी आम्हाला आमच्या लेखकांना 1.5 कोटींहून अधिक रॉयल्टी देण्यास मदत केली, ज्यामध्ये 18 लेखकांनी 1 लाखाहून अधिक कमाई केली आणि 500 पेक्षा जास्त लेखकांनी 5000 पेक्षा जास्त कमावले. हे कालच घडल्यासारखं वाटतं, जेव्हा प्रतिलिपिच्या बाहेर कोणी आमच्या लेखकांबद्दल आणि त्यांच्या कथांबद्दल स्वारस्य दाखवेल की नाही अशी शंका लोकांच्या मनात आली होती. पण आता, प्रतिलिपिवरील कथा पाच टीव्ही शो आणि वेब सिरीजमध्ये रूपांतरित झाल्या आहेत आणि अजून बरेच काही येणे बाकी आहे! गेल्या अनेक वर्षांपासून तुमचा विश्वास आणि प्रेम आम्हाला दररोज आमचे सर्वोत्तम देत राहण्यास प्रेरित करत आहे. आम्हाला माहित आहे की आम्हाला अजून खूप काही करायचे आहे. आमचे उद्दिष्ट अशा ठिकाणी पोहोचणे आहे जिथे आमचे हजारो लेखक प्रतिलिपिमधून कमाई करून त्यांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करून आनंदी जीवन जगू शकतील. प्रतिलिपिवरील कथा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे शीर्ष लेखक जेके रोलिंग्ज आणि जॉर्ज आरआर मार्टिन यांच्याप्रमाणे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आणि यशस्वी व्हावेत अशी आमची इच्छा आहे! आम्हाला माहित आहे की पुढचा प्रवास आता साधा किंवा सरळ असणार नाही. पण आम्हाला हे देखील माहित आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत आहात तोपर्यंत आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत राहू. परिस्थिती कशीही असो, तुमचे प्रेम आणि तुमच्या विश्वासाने आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि आम्ही नेहमीच आमचे सर्वोत्तम देऊ. #कोशिश जारी रहेगी!सर्व मजकूर पहा
- महत्त्वाची सूचना: प्रतिलिपिमध्ये साहित्य प्रकाशन करताना खालील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे11 सप्टेंबर 2024प्रिय लेखक, नमस्कार! ✨ महत्त्वाची सूचना: प्रतिलिपिमध्ये साहित्य प्रकाशन करताना खालील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे 📚 तुमच्या कथेतील पात्रे लिहिताना कोणत्या बाबी टाळाव्यात याबद्दल ही सामान्य मार्गदर्शक माहिती आहे. बहुधा खालील प्रकरणांमध्ये प्रतिलिपि टीम लेखकाचे साहित्य हटवते आणि प्रोफाइल ब्लॉक करते. 🚫 हिंसा, बलात्कार किंवा पात्रांमधील संमती नसलेल्या लैंगिक संबंधांचे वर्णन लिहिणे प्रकर्षाने टाळा. 📸 वाचकांना आकर्षित करण्यासाठी संवेदनशील कव्हर इमेज अपलोड करणे टाळा. कृपया लक्षात ठेवा, प्रतिलिपि टीम संवेदनशील कव्हर इमेजेस आणि संपूर्ण साहित्य कोणत्याही पूर्व चेतावणीशिवाय ब्लॉक करते. ⚠️ तुमच्या पत्रांच्या संवादांमध्ये असभ्य भाषा, शरीराच्या अवयवांची नावे आणि अयोग्य, वाईट आणि निषिद्ध शब्द कधीही वापरू नका. 🔞 प्रौढ साहित्य शैलीचे कोणतेहे इशारे, सूचना, 18+ इमोजी इत्यादी शीर्षक आणि साहित्यामध्ये नमूद करू नका. त्याऐवजी, मुळात कृपया तुमच्या साहित्यामध्ये संवेदनशील मजकूर लिहिणे पूर्णपणे टाळा. ⚡तुमच्या अगोदरच प्रकाशित साहित्यामध्ये तुम्ही अतिशय संवेदनशील मजकूर लिहिला असल्यास त्वरित तो संपादित करा. अतिशय संवेदनशील दृश्ये त्वरित काढून टाका आणि तुमचे साहित्य अपडेट करून पुन्हा जतन करा. तुमच्या साहित्य संपादनाचा ॲक्सेस लॉक केलेला असल्यास तुम्ही आमच्या टीमला संपादनासाठी विनंती करू शकता. ❌ जर तुम्हाला इरोटिका/शृंगार लेखन शैली प्रकाराबाबत अचूक माहिती नसेल तर कृपया या शैलीमध्ये लिहिणे टाळा. 🛑 तुमच्या वाचकांना उत्तेजित करण्यासाठी पात्रांमधील कोणतेही रोमँटिक किंवा प्रणय दृश्य उगाच अतिरंजित करून आणि मसालेदार करून लिहिणे टाळा. साहित्याच्या नैतिक मर्यादेत राहा. ⛔ कृपया हे समजून घ्या, कारण साहित्याच्या मर्यादेत राहून लिहिलेले इरोटिका/शृंगार आणि साहित्याच्या मर्यादा ओलांडून लिहिलेले इरोटिका/शृंगार यातील फरक समजून घेणे हे वेगवेगळ्या लोकांसाठी व्यक्तिनिष्ठ आहे. तसेच कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ नये यावर दोन पक्ष कधीही सहमत होऊ शकत नाहीत. यामुळे, जेव्हा जेव्हा अतिसंवेदनशील साहित्याची तक्रार केली जाते तेव्हा आमची टीम अशा साहित्यावर अंतिम कारवाई करते. 💖 आम्ही आमच्या लेखकांना विविध प्रकारचे परिपक्व विषय एक्सप्लोर करण्यासाठी प्रोत्साहित करतो ज्यात बलात्कार, क्रूरता किंवा अत्यंत हिंसाचाराचे स्पष्ट वर्णन लिहिणे समाविष्ट केलेले नाही. ध्यानात घ्या, तुमची सर्जनशीलता वाचकांच्या आयुष्यात अकल्पित चमत्कार घडवू शकते. तेव्हा, चला अधिक जबाबदारीने आणि मर्यादेत राहून सर्जनशीलतेचा साक्षात्कार घडवू या! सादर, टीम प्रतिलिपिसर्व मजकूर पहा
- सुपर लेखक अवॉर्ड्स - 7 | निकाल22 जुलै 2024प्रिय लेखकांनो, प्रतीक्षा संपली आहे! सुपर लेखक अवॉर्ड्स - 7 चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विजेत्या लेखकांचे नाव उघड करण्यापूर्वी, काही शब्द आहेत जे आम्ही तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. या पर्वाने लेखकांचा स्पर्धेमधील सहभाग संख्येच्या बाबतीत मागील सर्व विक्रम मोडले आहेत. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत 60 भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे. 'सुपर लेखक अवॉर्ड्स' हा देशातील सर्वात लोकप्रिय साहित्य पुरस्कारांपैकी एक कसा बनला आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. १२ भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे! उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व सुपर लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आम्हाला प्राप्त झालेल्या असंख्य कथांमधून तुमच्या कथा निखरून समोर आल्या आणि तुमच्या या यशाबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. सर्व सहभागी लेखकांना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही हिरीरीने दाखवलेल्या सहभागाबद्दल आणि ही स्पर्धा उत्तुंग यशस्वी केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमची लेखनाची आवड आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आमच्या व्यासपीठावर एवढी लेखन प्रतिभा असल्याचा आम्हाला अभिमान आहे! मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! भविष्यात तुम्ही असे उत्तम लेखन कराल अशी आम्ही आशा करतो. सूचना : खालील विजेत्यांना पुढील 48 तासांत [email protected] वरून बक्षीसासाठी आवश्यक तपशील मिळण्यासाठी ईमेल प्राप्त होईल. ************************ परीक्षकांची निवड (सुपर 7 कथमालिका) (सुपर 7 लेखकांना ₹5000 रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र घरपोच मिळेल) ग्रहण - Jyotika तू औरों की क्यों हो गयी ..💘 - Radha ❤️❤️ एक इजाजत. - Dr Vrunda F (वसुंधरा..) देवी रक्षति रक्षितः - Sarika Kandalgaonkar True love ❤️ - Gayatri Rode मोकळा श्वास.....१ - Sarita Sao Shreya सेल युअर ड्रीम्स - A passionate love story - Archana Sonagre Archuu ************************ वाचकांची पसंती (सुपर 7 कथा मालिका) (सुपर 7 लेखकांना ₹5000 रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र घरपोच मिळेल) हुकूमसा 😈A ROYAL DEMON - Ambrosia अबोली.... संघर्ष तिच्या जीवनाचा - Kalyani आई : who never leave you alone - Rupali Mohite 🍁Rupshree🍁 चैत्र पालवी - एक नवी सुरुवात. - सौ अमृता येणारे जाधव गिन्नी अधिरा...एक डाव प्रेमाचा❤️🔥😈 - प्रिती मंचरे🌻 ✍️प्रितलिखीत सप्तपदी नाविन्याची - Dr Shalaka Londhe दिनिशा गुंतता हृदय हे - Shilpa Sutar ************************ 77 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी गुंतता हृदय हे - Shilpa Sutar तू औरों की क्यों हो गयी ..💘 - Radha ❤️❤️ ग्रहण - Jyoti गुंतता हृदय हे - १ - Trupti Koshti अचानक एका वळणावर - Rohini Bangar संजना - बेपणाह दिवणगी भाग 1 - Gauri शब्द सखी ❣️❣️ अबोली.... संघर्ष तिच्या जीवनाचा - Kalyani एक डाव प्रेमाचा - Ekta प्रेमाग्नी ❤️🔥 - Ashwini Kamble Ashu प्रथा पर्व 2 - Anushree Dhabekar अनु एक इजाजत. - Dr Vrunda F (वसुंधरा..) खट्याळ प्रेमाची गोड गोष्ट🔥❤️ - देववीरा भाग १ - प्रतिक्षा प्रमोद जोशी 🍁✨ 34 शब्दांचे मोती 34 शब्दांचे मोती 🍁✨ सप्तपदी नाविन्याची - Dr Shalaka Londhe दिनिशा प्रारब्ध सीझन ४ (भाग १) - Author Sangieta Devkar Print Amp Media Writer "पुन्हा नव्याने प्रीत फुलली" भाग 1 - स्वाती पाटील *रडणारे मन, तडफडणारे शरीर* - प्रदीप कुलकर्णी विवेक मिस्टर अँड मिसेस सोल्मेट❤️ - Aishwarya Patil 1 सेल युअर ड्रीम्स - A passionate love story - Archana Sonagre Archuu प्रेम मैत्री आणि धोका भाग १ - Rashmi Kankekar गनिमी कावा - Amit Ashok Redkar True love ❤️ - Gayatri Rode "राज" कारण - चैत्राली यमगर Dombale आई : who never leave you alone - Rupali Mohite 🍁Rupshree🍁 काशी मठ भाग:१ - सुदिन नाईक Nandu एक अनामिक ओढ. -पर्व दुसरे ( भाग 1) - नरेंद्र कुलकर्णी मोकळा श्वास.....१ - Sarita Sao Shreya अधिरा...एक डाव प्रेमाचा❤️🔥😈 - प्रिती मंचरे🌻 ✍️प्रितलिखीत एक नाते चुकलेले 💜 काळजात रुतलेले. - Jyoti Jadhav उंच माझा झोका... - शब्द हृदयातील केतू...😘 💞💞 तु हवीशी....💞🌷 - 💕Amol Sone 💕Amu...world मी नक्की केल प्रेम कोणावर ........ - Rameshwari Kanade Roma एका श्वासाचं अंतर - मोहिनी बागडे सूचना : सर्व डिजिटल प्रमाणपत्रे आणि राजपत्रे लेखकांसह [email protected] द्वारे पाठविली जातील आणि सर्व कथामालिका एका आठवड्याच्या आत प्रतिलिपि ॲपच्या होमपेज बॅनरवर उपलब्ध होतील. आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या सुपर लेखक अवॉर्ड - 8 आणि प्रतिलिपि क्रिएटर्स लेखन चॅलेंज 2.0 मध्ये सहभागी व्हाल आणि तुमच्या वाचकांना लोकप्रिय आणि बेस्ट सेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event पुढील लेखनासाठी शुभेच्छा!सर्व मजकूर पहा